Current Affairs20 November 2026
MPSC गट-क परीक्षा: शिल्प निदेशक पदासाठी शैक्षणिक अर्हतेत बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या शुद्धिपत्रकानुसार गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधील शिल्प निदेशक (Craft Instructor) संवर्गासाठी शैक्षणिक अर्हतेत सुधारणा केली आहे. ३१ जुलै २०२६ च्या अधिसूचित सेवाप्रवेश नियमांनुसार संबंधित व्यवसाय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र (NAC) किंवा राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (NTC) सोबत राष्ट्रीय शिल्प निदेशक प्रमाणपत्र (NCIC/CITS) उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. याव्यतिरिक्त संबंधित अभियांत्रिकी किंवा तंत्रशास्त्रातील पदविका अथवा पदवीधारक उमेदवारही पात्र ठरतील. गट-क परीक्षेतील १६,७१७ रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर २०२६ आहे.