MPSC Group C Exam 2026: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा
MPSC Planner Editorial Team
Summary
MPSC Group C 2026 ची पदे, पात्रता, परीक्षा टप्पे आणि अधिकृत अपडेट.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा - सविस्तर माहिती
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध गट-क संवर्गातील पदांसाठी आयोजित केली जाते. प्रत्येक जाहिरातीतील पदे, पात्रता आणि निवडीच्या अटी वेगळ्या असू शकतात.
2026 अधिकृत अपडेट — जाहिरात 017/2026: 22 जुलै 2026 च्या शुद्धिपत्रकाद्वारे 3,088 अतिरिक्त पदांचा समावेश करण्यात आला. सुधारित एकूण पदसंख्या 5,707 आहे; यात महसूल व वन विभागातील 1,539 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदे आहेत. संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी Offline OMR पद्धतीने होणार आहे. अर्जाची मुदत 5 ऑगस्ट 2026, 23:59 पर्यंत आणि शुल्काची मुदत 6 ऑगस्ट 2026, 23:59 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तलाठीची सविस्तर माहिती पहा.
१. परीक्षा प्रक्रियेची अधिकृत चौकट
20 मे 2026 च्या MPSC परीक्षा योजनेनुसार गट-कसाठी संयुक्त लेखी पूर्व परीक्षा घेतली जाते. ही मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठीची चाळणी परीक्षा आहे; पूर्व परीक्षेचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत जोडले जात नाहीत.
पूर्व परीक्षेच्या निकालानंतर, जाहीरातीत निवडलेल्या संवर्ग आणि पदसंख्येनुसार मुख्य परीक्षेसाठी उमेदवार पात्र ठरतात. योजनेत साधारणपणे उपलब्ध पदांच्या सुमारे 12 पट उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र करण्याची प्रक्रिया नमूद आहे.
२. संयुक्त पूर्व परीक्षा
| घटक | अधिकृत परीक्षा योजनेतील तपशील |
|---|---|
| विषय | सामान्य क्षमता चाचणी |
| प्रश्न / गुण | 100 प्रश्न / 100 गुण |
| दर्जा | पदवी स्तर |
| माध्यम | मराठी व इंग्रजी |
| कालावधी | 1 तास |
| स्वरूप | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी लेखी परीक्षा |
| चुकीच्या उत्तरासाठी | 1/4 (25%) नकारात्मक गुण |
2026 च्या शुद्धिपत्रकानुसार ही परीक्षा 25 ऑक्टोबरला Offline OMR पद्धतीने होईल.
३. मुख्य परीक्षा व अंतिम निवड
मे 2026 ची योजना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक वगळता त्या वेळच्या गट-क संवर्गांसाठी संयुक्त मुख्य लेखी परीक्षा सांगते:
- पेपर 1 — मराठी व इंग्रजी: 100 प्रश्न, 200 गुण, 1 तास.
- पेपर 2 — सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी: 100 प्रश्न, 200 गुण, 1 तास.
- दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा होतात.
- अंतिम संवर्गनिहाय गुणवत्ता यादी संबंधित संयुक्त मुख्य परीक्षेतील गुणांवर तयार होते.
तलाठीचा समावेश 22 जुलैच्या शुद्धिपत्रकाने नंतर झाला आहे. त्यामुळे तलाठीच्या मुख्य परीक्षा/अंतिम निवडीच्या स्वतंत्र अटींसाठी पुढील MPSC सूचना अंतिम मानावी.
४. पात्रता व टायपिंग
पात्रता, वयोमर्यादा आणि आवश्यक प्रमाणपत्रे पदानुसार बदलतात. कर सहाय्यक व लिपिक-टंकलेखक यांच्यासाठी योजनेत मराठी टायपिंग 30 WPM आणि इंग्रजी टायपिंग 40 WPM अशी अर्हता नमूद आहे. तलाठी पदासाठी शुद्धिपत्रकात कोणत्याही शाखेतील पदवी नमूद आहे.
५. अधिकृत माहिती कुठे तपासावी?
जाहिरात, शुद्धिपत्रक आणि संबंधित सेवा-प्रवेश नियम यांच्यात फरक असल्यास त्या-त्या भरतीची नवीनतम अधिकृत सूचना ग्राह्य धरावी.